रत्नागिरी : म्हसेश्वर सडामिऱ्या येथील श्री नवलाई पावणाई मंदिरात येत्या २५ मार्च २०२५ रोजी श्री देवी नवलाई पावणाई पालखीचा भव्य उत्सव आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा सायंकाळी ८ वाजता ढोल-ताशांच्या गजरात पालखी नाचविण्यास प्रारंभ होणार असून, या उत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन सर्व भाविकांना करण्यात आले आहे.श्री नवलाई पावणाई मंदिर परिसरात होणाऱ्या या उत्सवात येणाऱ्या सर्व भक्तांचे सहर्ष स्वागत करण्यात येणार आहे. या सोहळ्याच्या अधिक माहितीसाठी जय सावंत (संपर्क: 7276666661) आणि वैभव सावंत (संपर्क: 8087109121) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. हा पारंपरिक उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होतो. यंदाही भाविक मोठ्या संख्येने सहभागी होऊन या सोहळ्याची शोभा वाढवतील, अशी अपेक्षा आहे. सर्वांनी वेळेत उपस्थित राहून या उत्सवाचा आनंद घ्यावा, अशी विनंती आयोजकांनी केली आहे.














