रत्नागिरी : आज सायंकाळी अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे रत्नदुर्ग किल्ल्याचा पायथ्याशी उभारण्यात आलेल्या रत्नदुर्ग शिव सृष्टी लोकार्पण सोहळा रद्द करण्यात आला आहे. हा लोकार्पण सोहळा आता उद्या दिनांक ७ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता होणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
मंत्री उदय सामंतांच्या संकल्पनेतून रत्नदुर्ग किल्ल्याचा पायथ्याशी भव्य शिव सृष्टी उभारण्यात आली आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा २९ फूट भव्य असा पुतळा उभारण्यात आला आहे. शिवाय अनेक किल्ल्यांच्या प्रतिकृती येथे तयार करण्यात आल्या आहेत. हा प्रकल्प रत्नागिरीच्या सौंदर्यात भर टाकणार आहे. आज सायंकाळी त्याचे लोकार्पण होणार होते. या लोकार्पणाच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी नगरपालिकेने केली होती. मोठ्या संखेने नागरिक देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. मात्र अचानक आलेल्या वादळी पावसाने दाणादाण उडवली. अखेर हा आजचा कार्यक्रम रद्द करावा लागला. आता उद्या सायंकाळी ७ वाजता हा लोकर्पणाचा कार्यक्रम होणार आहे.
