रत्नागिरी, दि. २६ मार्च २०२५: रत्नागिरीतील ऐतिहासिक पतितपावन मंदिरात तब्बल ८० वर्षांनंतर पुन्हा एकदा हरीनामाचा गजर दुमदुमणार आहे. यापुढे दर महिन्याच्या शिवरात्रीला वेगवेगळ्या भजनी बुवांच्या माध्यमातून संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात येत्या गुरुवार, दि. २७ मार्च २०२५ पासून होत असून, रत्नागिरीतील प्रसिद्ध भजनी सुदेशबुवा नागवेकर हे संध्याकाळी ७ वाजता मंदिरात भजन सादर करणार आहेत. या भजनाचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मंदिर व्यवस्थापनाने केले आहे.
पतितपावन मंदिर हे रत्नागिरीतील एक प्राचीन आणि श्रद्धास्थान असून, येथील धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांना विशेष महत्त्व आहे. गेल्या ८० वर्षांपासून मंदिरात भजनाचा नियमित कार्यक्रम आयोजित होत नव्हता. मात्र, आता या परंपरेला पुन्हा सुरुवात होत असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दर महिन्याच्या शिवरात्रीला भजनाचा हा सोहळा आयोजित करण्याचा निर्णय मंदिर व्यवस्थापनाने घेतला असून, यामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होईल, अशी अपेक्षा आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:33 PM 26/Mar/2025














