चिपळूण : सध्या बांगला देशातून होणारी घुसखोरी हा राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न बनला आहे. जिल्ह्यात दहशतवादविरोधी शाखा रत्नागिरी यांनी मधल्या काळात बांगला देशी घुसखोर यांच्यावर कारवाई ही केली. मात्र, या घुसखोरांचा वापर कामगार म्हणून ही केला जात आहे, असे ही आढळून येत आहे.
यातील काहींवर अटकेची कारवाई होऊन जामीन मिळाल्यावर ते येथे राहून रोजगार करीत आहेत. देशहिताच्या दृष्टीने आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून रोहिंग्या आणि बांगला देशी घुसखोरांना एमआयडीसी परिसरातील कारखाने, कारखान्यातून कामे दिली जाऊ नयेत, असे कार्यालयाकडून पत्र दिले जावे.
तसेच कारखाने यांनीही ‘आमच्या येथे रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांना प्रतिबंध आहे, असे जाहीर फलक लावण्यास सांगावेत, या मागणीचे निवेदन हिंदू जनजागृती समितीच्यावतीने चिपळूण येथील एमआयडीसी अधिकारी आणि लोटे परशुराम औद्योगिक संघटनेला दिले. यावेळी शिवसेनेचे श्री अनुराग उतेकर, प्रशांत उतेकर, भाजप जिल्हा चिटणीस विनोद भुरण, उमेश गुरव, अभिनव भुरण आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:04 AM 27/Mar/2025














