आतापर्यंत प्रशासकीय सेवेत असा मंत्री पाहिला नाही : जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह

पालकमंत्र्यांच्या कार्यशैलीबाबत गौरवोद्‌गार

रत्नागिरी : जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या लोकार्पण सोहळ्यावेळी प्रशासकीय मनोगत व्यक्त करताना पालकमंत्री उदय सामंत यांची काम करण्याची क्षमता आणि आवाका विशद केला. शासकीय अधिकाऱ्यांचे आठवड्यातील पाच दिवस असतात असे सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी आम्ही दोन वर्षात प्रत्येक शनिवार, रविवारी सुट्टीच्या दिवशी काम केले असल्याचे सांगितले. प्रशासकीय सेवेतील १४ वर्षांच्या अनुभवात असा मंत्री पाहिला नसल्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

रत्नागिरीतील मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी प्रशासकीय मनोगत व्यक्त केले. आठवड्याचे पाच दिवस शासकीय अधिकाऱ्यांना काम करावे लागते, असा समज होता; पण गेले दोन वर्ष आम्ही प्रत्येक शनिवार, रविवारीसुद्धा काम केले. यातून जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांचा विकासकामांसंदर्भात धडाका कसा होता, हेच अप्रत्यक्षरित्या सांगितले.

संपूर्ण नियोजन आणि शासनाकडून निधी मिळण्यासाठी पाठपुरावा करणारे पालकमंत्री दिवसरात्र झटत होते. त्यासाठी आवश्यक असणारी प्रशासकीय यंत्रणेची मदत मिळवण्यासाठी ते सतत कामांचा आढावा घेत होते. आपल्या १४ वर्षाच्या प्रशासकीय सेवेच्या काळात असा मंत्री पाहिला नसल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. विकासकामांच्या संकल्पना घेवून काम करणारे पालकमंत्री आहेत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 PM 07/Oct/2024