चिपळूण : चिपळूण तालुका शांतता कमिटीच्या बैठकीत उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांनी मार्गदर्शन करताना आगामी काळातील सण व उत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले.
सण, उत्सव साजरे करत असताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे कोणतेही वर्तन करू नये. सोशल मीडियावर एखादी पोस्ट करताना सामाजिक सलोखा तसेच धार्मिक भावना दुखावणार नाही, याची खबरदारी सर्वांनी घ्यावी. अशी एखादी पोस्ट सोशल मीडियावर आल्यास तिची पोलिसांना कल्पना द्यावी. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी राजमाने यांनी केले.
या बैठकीला पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे, गुहागरचे पोलिस निरीक्षक सचिन सावंत, अलोरे, शिरगाव पोलिस निरीक्षक भारत पाटील, जिल्हा शांतता समितीचे शौकत मुकादम, प्रताप शिंदे, उमेश सकपाळ, विनोद झगडे, नाझीम अफवारे, करामत मिठागरी, रामदास राणे, दादा साळवी, विजय गुजर, दिशा दाभोळकर, राणी महाडिक, शाहीद खेरटकर आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:41 AM 27/Mar/2025














