खानापूर : महाराष्ट्राचे माजी मंत्री रामदास कदम आणि शिवसेना उपनेते नितीन बानुगडे-पाटील यांच्यावरील खटल्याची सुनावणी (बुधवारी) खानापूर न्यायालयात पार पडली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्यांच्यावर दोषारोप निश्चित करत साक्षीदार आणि पंच असे मिळून चौघांना पुढील सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले. या खटल्याची पुढील सुनावणी १४ मे रोजी होणार आहे.
हा खटला २००६ मध्ये खानापूर येथे झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दाखल महामेळाव्यासंदर्भात करण्यात आला होता. या खटल्यावर न्यायालयाने दोषारोप निश्चित केले असून, पुढील सुनावणीत पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पडणार आहे.
दरमान्य रामदास कदम आणि नितीन बानुगडे-पाटील यांचे खानापूर येथे सकाळी ११ वाजता आगमन झाल्यावर यशवंत बिर्जे, राजेंद्र पाटील, महादेव घाडी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी अनेक स्थानिक नागरिकही उपस्थित होते. या प्रकरणात वकील शामसुंदर पत्तार, अॅड. हेमराज बेंचणावर हे त्यांचे काम पाहत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 PM 27/Mar/2025














