राजापूर : कोदवली नदीतील १६ टक्केच गाळ उपसा

राजापूर : पावसाळ्यामध्ये सातत्याने उद्भवणाऱ्या शहरातील पूरस्थितीला कारणीभूत ठरणारा अजुर्ना-कोदवली नदीपात्रातील गाळाचा पाटबंधारे विभागातर्फे उपसा केला जात आहे. त्यामध्ये अर्जुना-कोदावली घनमीटरपैकी २० हजार ७०० झाला आहे; मात्र, उपसा केलेला गाळ नदीच्या काठावर पिचिंग करून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे हा गाळ पावसाळ्यात पाण्यासोबत पुन्हा एकदा नदीपात्रामध्ये वाहुन येत साचण्याचा अन् त्यातून, पुन्हा एकदा गाळ संचयाने नदीपात्र भरण्याचा धोका वर्तवण्यात येत आहे.

पूरस्थितीला कारणीभूत ठरणाऱ्या अजुर्ना-कोदवली नदीपात्रातील गाळाचा उपसा करून राजापूरवासियांना दरवर्षी भेडसावणारी पूरस्थितीची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आमदार किरण सामंत यांनी पुढाकार घेतला आहे. या गाळ उपशाच्या या कामासाठी आमदार सामंत यांनी ५२ लाख रुपयांचा निधी मंजूरही केला आहे.

या निधीतून गाळ उपशाचे काम सुरू आहे. त्यामध्ये अर्जुना नदीपात्रातील कोंढेतड पूल ते राजीव गांधी क्रीडांगण या दरम्यान झालेल्या ७७ हजार ५३५ घनमीटर गाळापैकी १७ हजार ८५० घनमीटर तर कोदवली नदीपात्रातील जवाहरचौक ते गणेशघाट या भागातील ४९ हजार ६६५ पैकी २ हजार ८५० घनमीटर गाळाचा उपसा झाल्याची माहिती पाटबंधारे विभागातर्फे देण्यात आली. तीन पोकलेन, तीन बुलडोजर आणि पाच डंपर यांचा उपयोग करत गाळ उपशाचे अद्यापही काम सुरू असल्याचेही पाटबंधारे विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले.

गाळ उपसा झाल्यानंतर त्याची नदीपात्रातून अन्यत्र वाहतूक होणे अपेक्षित आहे जेणेकरून गाळ उपशानंतर नदीपात्र मोकळे होईल. दरम्यान, नदीपात्रामध्ये उपसलेला गाळ रितसर परवानगी घेऊन स्वखचनि वाहून नेण्याचे आवाहन महसूल प्रशासनाने केले होते. मात्र, त्यालाही शेतकऱ्यांकडून अल्प प्रतिसाद मिळालेला दिसत आहे.

त्यामुळे उपसा केलेला गाळ तसाच नद्यांच्या काठावर पिचिंग करून ठेवण्यात येत आहे. पावसाळ्यामध्ये नद्यांच्या पाण्याची पातळी वाढताच पिचिंग केलेला गाळ पुन्हा एकदा नदीपात्रामध्ये वाहून येत साचण्याचा नदीपात्र पुन्हा एकदा गाळ संचयाने भरण्याचा धोका वर्तवण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:26 PM 27/Mar/2025