चिपळूण : शिक्षण विस्तार अधिकारीपदी रमाकांत पवार यांची नियुक्ती

रामपूर : जिल्हा परिषद रावळगाव शाळा नं. १ चे मुख्याध्यापक रमाकांत उर्फ नाना पवार यांची शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून बीट चिपळूण नं.२ पदोन्नती झाली आहे. (ता. चिपळूण) येथे रमाकांत पवार यांच्या शिक्षकी सेवेस दापोली तालुक्यातून सुरुवात झाली. सध्या ते रावळगाव शाळा क्र. १ मध्ये मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. एक सेवाभावी, उपक्रमशील शिक्षक म्हणून ते परिचित असून सामाजिक कार्यातही ते अग्रेसर असतात. राष्ट्रभाषा हिंदी संघटनेचे ते सचिव होते.

ज्ञानदीप वाचनालय ओमळीचे ते सचिव आहेत. आतापर्यंत प्रामाणिकपणे काम केले असून सेवा काळात असलेल्या प्रत्येक शाळेच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले आहेत. या पुढेही जबाबदारी ओळखून मी माझ्या पदाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन, असे रमाकांत पवार यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 AM 28/Mar/2025