आसगे : येथील ग्रामदैवत श्री इटलादेवी रवळनाथ मंदिरात नवरात्रौत्सव सुरू झाला असून, त्यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १० रोजी श्री सांब प्रासादिक नाच मंडळ, घाटीवळे, शाहीर कैलास देवाळे, ता. लांजा व महाकाली नाच मंडळ, कोलधे, शाहीर विनायक कुंभार, ता. लांजा यांच्या जाखडी नृत्याचा डबलबारी सामना, शुक्र. दि. ११ रोजी सत्यनारायण पूजा, शनि. १२ रोजी दसरा उत्सव तसेच प्रत्येक दिवशी वाडीवार भजन, आरती व करमणुकीचे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 PM 07/Oct/2024