Ajit Pawar on Uddha Thackeray : उद्धव ठाकरे यांनी विधानमंडळामध्ये काम केलं तर त्यांना त्या विषयाचा अर्थ समजेल. पाच दहा मिनिटे हजेरी लावून काही समजणार नाही असे वक्तव्य करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोला लगावला.
आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे किती वेळ उपस्थित होते? कुठलाही प्रश्न त्यांनी मांडला नाहीत असेही अजित पवार म्हणाले. विधीमंडळाचे अधिवेशन हे चार तास झाले. या काळात दररोज आम्ही 9 तास काम करत होतो असेही अजित पवार म्हणाले. विरोधकांना कोणताच मुद्दा राहिलेला नाही. त्यामुळं ते मुद्दे काढत आहेत असे अजित पवार म्हणाले.
गुरुवारी कोल्हापूरमध्ये विविध विषयांच्या संदर्भातील आढावा घेतल्याचे अजित पवार म्हणाले. पुढच्या वर्षभरात कोणत्या कामासाठी किती निधी द्यावा लागणार आहे, याबाबतही चर्चा झाल्याची माहिती अजित पवार म्हणाले. महानगरपालिकेला देखील चांगल्या इमारतीची गरज असल्याचे अजित पवार म्हणाले. उत्तम प्रकारच्या शाळा कशा होतील यावर देखील चर्चा झाली आहे. चर्चा समाधानकारक झाली आहे. काही गोष्टींमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करावी लागेल असे अजित पवार म्हणाले. कोल्हापूरच्या विमानतळाच्या संदर्भात देखील चर्चा झाल्याचे अजित पवार म्हणाले.
लाडकी बहिणी आणि वीज माफीची योजना आम्ही बंद केली नाही
नवीन आलेल्यांना मान सन्मान देऊ, पण जुन्या नेत्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. आपला पक्ष सर्व जाती धर्माचा आहे. लाडकी बहिणी आणि वीज माफीची योजना आम्ही बंद केली नाही. पुढची पाच वर्षे लाडकी बहीण योजना बंद करणार नाही असेही अजित पवार म्हणाले. माझी थोडी तारांबळ होतेय, पण मी मार्ग काढतोय. 2100 रुपये कधी द्यायचं याचा निर्णय मी योग्य वेळी घेईन असेही अजित पवार म्हणाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 28-03-2025
