देवरुख : संगमेश्वर येथील शिंपणे उत्सव आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सायंकाळी शहरातील प्रमुख मार्गावरुन उपअधीक्षक शिवप्रसाद पारवे यांच्या नेतृत्वाखाली हे पथसंचलन झाले. पोलीस ठाण्या पासून पथसंचलनाला सुरुवात झाली.
मुंबई-गोवा महामार्गा वरून सोनवी चौक, संगमेश्वर बाजारपेठ रस्ता, शहर अंतर्गत रस्ता, आदी सार्वजनिक व लोकवस्ती ठिकाणाहून पोलीस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, सहाय्य्क पोलीस उपनिरीक्षक, पोलीस कॉन्सटेबल, पोलीस नाईक, पोलीस हेड कॉन्सटेबल यांनी पथ संचलन केले.
संगमेश्वर पोलिस ठाण्यातील पोलिस उप अधीक्षक शिवप्रसाद पारवे, पोलीस उपनिरीक्षक शंकर नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक राजेश शेलार, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कांबळे, पोलीस उप निरीक्षक प्रशांत शिंदे आदी पोलिस व महिला पोलिस कर्मचारी होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 29/Mar/2025














