रत्नागिरी : विविध मागण्यांसाठी राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेने सोमवारी (दि. ७ ऑक्टोबर) रोजी पुकारलेले आत्मक्लेष आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आल्याची माहिती संघटनेचे विभागीय अध्यक्ष शेखर सावंत आणि विभागीय सचिव पी. एस. जाधव यांनी दिली.
जिल्हाधिकारी कचेरीसमोर संघटना आंदोलन करणार होती. आंदोलन नोटिशीच्या अनुषंगाने २५ सप्टेंबरला उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांनी संघटनेबरोबर बैठक आयोजित केली होती. बैठकीत बहुतांश मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली होती. तथापि, त्याचे इतिवृत्त आपल्याला प्राप्त झाले नव्हते. त्यानंतर पुन्हा एकदा उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांनी संघटनेस भेटीसाठी बोलावले. त्यानुसार जनरल सेक्रेटरी विचारे व केंद्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांनी भेट घेतली. त्यांनी बैठकीत झालेल्या चर्चेचे इतिवृत्त विचारे यांना सुपूर्द केले. त्याखेरीज प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याबाबतचे तोंडी आश्वासनही दिले व आंदोलन स्थगित करण्याबाबत विनंती केली. त्यानुसार हे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:03 07-10-2024
