राजापुरात १८ एप्रिल ते २० एप्रिल दरम्यान कीर्तन महोत्सवाचे आयोजन

राजापूर : शहरातील कीर्तनप्रेमी राजापूर यांच्या वतीने १८ एप्रिल ते २० एप्रिल या कालावधीत श्री मंगल कार्यालय गुजराळी येथे कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे.

राजापूर तालुक्याला अध्यात्मिक पार्श्वभूमी असून ग्रामीण भागासह होणाऱ्या यात्रा, धार्मिक उत्सव यामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले जाते. तालुक्यातील कीर्तनप्रेमींना बरेच उत्सव प्रत्येक गावागावांत होत असल्याने इच्छा असूनही सर्व कीर्तनाचा आस्वाद घेता येत नाही हे लक्षात आल्याने व कीर्तन हे समाजप्रबोधनाचे एक उत्तम माध्यम असल्याने कीर्तनप्रेमी राजापूर यांनी या कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे.

राजापूर शहरासह ग्रामीण भागात अनेक किर्तन प्रेमी नागरीक असले तरी त्याना एकाच मंचावर विविध विषयांची किर्तन ऐकावयास मिळत नाहीत, याचा सारासार विचार करून राजापूर शहरातील कीर्तनप्रेमी ग्रुपने १८ एप्रिल ते २० एप्रिल या दरम्यान शहरातील श्री मंगल कार्यालय गुजराळी येथे कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे. या कीर्तन महोत्सवाचा आनंद कीर्तन प्रेमींनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:20 PM 29/Mar/2025