संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील अपघात प्रवण क्षेत्रातील चौपदरीकरणाचे काम गेले अनेक वर्षे रखडलेले आहे. आरवली ते बावनदी या अपघात प्रवण क्षेत्रात संगमेश्वर ओझरखोल ते तुरळ या पट्ट्यातील चौपदरीकरण कुर्म गतीने सुरू आहे. त्यामुळे अपघातात वाढ झाली असून वाहनचालकांचा नाहक बळी जात आहे.
कच्च्या रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे, महामार्गाचे काम सुरू होण्यापूर्वी भूमिपूजन झालेल्या बावनदी, सोनवी, कोळंबे, शास्त्री पुलांचेही काम अजून संथगतीने सुरू आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर शास्त्रों पूल, सोनवी पुलाजवळ धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे.
चौपदरीकरणाचे काम सुरू असताना अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक तसेच बनवण्यात आलेले जोड रस्ते हो धोकादायक बनलेल्या आहेत अनेक वेळा पाच ठिकाणी अपघात पडत आहेत, अपघात प्रवाह क्षेत्रामध्ये धोकादायक वळणे अजूनही हटवण्यात न आल्याने त्या ठिकाणी पूर्वीसारखी अपघात घडत आहेत. संगमेश्वर पैसाफेड हायस्कूलच्या समोर खड्पांकडे वारंवार सांगूनही ठेकेदार अजूनही दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.
पावसाळी ब्रेकनंतर महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, काम सुरू असल्याने बुद्धीचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गवर काम संगमेश्वर दरम्यान रखडलेले आहे. या कामाचा फटका बसत आहे. संगमेश्वर तालुक्यातील बावनदी सोनवी कोळंबे या पूलांची कामे संथ गतीने सुरू आहे त्यामुळे अर्धा तासाच्या प्रवासात्य दोन ते तीन तास प्रवास वेळ लागत असल्याने वाहन चालक ऋत झाले आहेत.
धुळीचा वाहनचालकांना त्रास
मोठ्या वाहनांमुळे सिमेंट अथवा खड्यात टाकलेल्या खडीची धूळ मोठ्या प्रमाणात परिसरात पसरत असून धुळीमुळे संसर्गजन्य रोगांना सामोरे जावे लागत आहे. एका बाजूला बदलते वातावरण आणि त्यामुळे बसणारा फटका त्या दुसऱ्या बाजूला धुळीचे लोट यामुळे संगमेश्वरवासीयांना त्रास सहन करावा लागत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:16 PM 31/Mar/2025














