स्नेहा जाधव यांना आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका पुरस्कार

चिपळूण : जिल्हा परिषद अंतर्गत आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका पुरस्कार स्नेहा जाधव यांना देऊन गौरवण्यात आले. साहाय्यक गटविकास अधिकारी केळस्कर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाला बालविकास प्रकल्प अधिकारी नायकुडे, प्रिती शिवगण, संरक्षण अधिकारी माधवी जाधव, पर्यवेक्षिका नीशा चिपळूणकर, सृष्टी हळये, शमिका नार्वेकर, रेखा कांबळे व अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस उपस्थित होत्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 AM 03/Apr/2025