एस. एम. जोशी यांचे आयुष्य मार्गदर्शक : अभिजीत हेगशेट्ये

रत्नागिरी : नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या रत्नागिरी येथील एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात एस. एम जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाविद्यालयाच्या आवारातील पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

या प्रसंगी मार्गदर्शन करताना नवनिर्माण नशिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये यांनी समाजातील दुर्बल आणि दुर्लक्षित घटकांसाठी आयुष्यभर निस्वार्थीपणाने काम करणारे आणि समाजवादी लोकशाहीसाठी झटणारे ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी यांचे संपूर्ण आयुष्यच एक मार्गदर्शक आहे. आणि नवनिर्माण शिक्षण संस्था त्यांच्याच मूल्यांवर कार्यरत आहे. असे प्रतिपादन केले.

पुढे बोलताना ते म्हणाले, आणिबाणीनंतर सामाजात निर्माण झालेल्या निराशाजनक काळात एस.एम. जोशी एक महत्त्वाचे प्रेरणास्थान होते. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा अधिक प्रभाव पडला. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत, शिक्षण क्षेत्रात काम करायचे ठरवले. नवनिर्माण शिक्षण संस्था गेली २५ वर्षे समाजातील अल्पसंख्याक आणि दुर्लक्षित घटकांसाठी कार्य करत आहे. एस. एम. जोशी मूळचे रत्नागिरीतील गोळपचे म्हणूनच त्यांचे रत्नागिरीशी असलेले नाते लक्षात घेता त्यांच्या नावाने फिजीओथेरपी कॉलेज सुरू करणे ही त्यांना खरी आदरांजली आहे असे वाटते. आपल्या मनोगताच्या शेवटी त्यांनी वसंत बापट आणि बाबा आमटे यांनी एस एम जोशी यांच्यावर केलेल्या कवितांचे सादरीकरणही केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना एस एम जोशी यांच्या कार्याची थोडक्यात माहिती देण्यात आली.
यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन आणि त्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख प्रा. शिंदे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आणि प्रास्तविक प्रा. अश्विनी कांबळे यांनी केले. सर्व विभागांचे सर्व प्राध्यापकवृंद शिक्षकेत्तर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी यावेळी उपस्थित राहिले.

Kohinoor furni.1

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 03-04-2025