खेड : मुंबई- गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ वाहतूक नियंत्रणासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात येणार आहे. या इमारतीचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अभियंता पंकज गोसावी यांनी दिली. बोगद्यातील वाहतूक नियंत्रणासह आपत्कालीन स्थितीत तैनात कर्मचाऱ्यांसह वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांना तातडीची मदत केली जाणार आहे.
बोगद्यात कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाल्यास तातडीने दूर करण्यासाठी स्वतंत्र कक्षाच्या इमारतीचा उपयोग होणार आहे. या स्वतंत्र कक्षात आवश्यक ती यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे येत्या १०-१५ दिवसातच दोन्ही बोगद्यातून वाहनचालकांचा दोन्ही बाजूकडील प्रवास सुसाट अन् आरामदायी होणार आहे. दोन्ही बोगद्यातील प्रवासात कोणत्याही प्रकारचे “विघ्न” येणार नाही, यादृष्टीनेही उपाययोजना करण्यात येणार आहेत.
कशेडी बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ सुरू असलेल्या स्वतंत्र कक्षाच्या इमारतीचे काम में अखेरीस पूर्ण होईल. याद्वारे दोन्ही बोगद्यातून दोन्ही बाजूकडून मार्गस्थ होणाऱ्या वाहनांवर विशेष लक्ष ठेवणे सोयीचे होईल. आपत्तीची घटना घडल्यास तातडीने निराकरण करणे सुलभ होईल- पंकज गोसावी, अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 AM 04/Apr/2025
