फणसवळे येथील तरुणाची आत्महत्या

रत्नागिरी : तालुक्यातील फणसवळे मधलीवाडी येथील एका २३ वर्षीय तरुणाने अज्ञात कारणातून गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. साहिल संतोष पाल्ये (२३, रा. फणसवळे मधलीवाडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साहिल संतोष पाल्ये याने सोमवारी १४ एप्रिल रोजी, सायंकाळच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच त्याला तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून, त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

या घटनेमुळे फणसवळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:20 16-04-2025