लांजा-तळवडे-कुरचुंब-दाभोळे मार्गाची दयनीय अवस्था

लांजा : लांजा तळवडे कुरुचुंब दाभोळे मार्ग आसगे ते कुरचुंबपर्यंत पूर्णतः खराब झाला आहे. रस्त्याच्या मद्यभागी मोठ मोठे खड्डे पडले असून वाहन चालकाना रस्त्यावरील वाहने चालवणे म्हणजे जीवावरची कसरतच ठरत आहे.

लांजा तळवडे कुरुचुंब दाभोळे हा मार्ग साखरपा पुढे कोल्हापूर जिल्ह्याला जोडला असल्याने या मार्गावरून वाहनांची मोठी वर्दळ असते. लहान हलक्या वाहनासह अवजड वाहने या मार्गावरून दिवस रात्र धावत असतात. सध्या लांजा तालुक्यातून कोल्हापूर, सांगलीच्या दिशेने अवजड वाहनाच्या सहाय्याने चिरे वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. १६ चाकी अवजड वाहनांची या मार्गवरून रहदारी वाढल्याने आसगे, तळवडे, कुरचुंब या ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. तळवडे घाट, आसगे या ठिकाणी पडलेले खड्डे मोठ्या अपघाताला निमंत्रण देत आहे.

यापूर्वी मार्गावर किरकोळ सह मोठे अपघात घडले आहेत. संबंधित विभागाने या मार्गाची डागडुजी करून रस्त्यावरील खड्डे भरावेत अशी मागणी स्थानिक वाहनचालक, नागरिक, प्रवाशांमधून केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:55 PM 16/Apr/2025