गणपतीपुळे : शालेय जीवनातच उद्योग व्यवसायकडे वळण्याचा कल विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे, कमवा आणि शिका, मनाला स्थिरता आणणे तसेच शाळेच्या गार्डनिंग मध्ये खारीचा वाटा उचलणे यांसारखे अनेक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन जीर्ण झालेल्या कौलांपासून प्रशालेत वृक्ष लागवाडीसाठी कुंड्या तयार करण्याचे वर्कशॉप रत्नागिरी तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल सैतवडे प्रशालेत घेण्यात आले.
या प्रशालेत घेण्यात आलेल्या वर्कशॉप मध्ये अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते. या वर्कशॉप ला प्रशालेचे क्रीडा शिक्षक नितीन जाधव व कलाध्यापक रमेश गंधेरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रशालेने राबवलेल्या या उपक्रमाचे संस्था अध्यक्ष सज्जाद अ. करीम सय्यद, जांभारी केंद्राचे केंद्रप्रमुख संदीप शितप, प्रभारी केंद्र मुख्याध्यापक दशरथ शिताळेसर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सिद्धी लांजेकर यांनी विद्यार्थ्यांच्या उद्योगी वाटचालीला शुभेच्छा दिल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:51 PM 04/Apr/2025
