उन्हाळी हंगामात ‘कोरे’तर्फे जादा गाडी

चिपळूण : कोकण – रेल्वेमार्गावरील प्रवाशांसाठी उन्हाळी हंगामातील अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी दक्षिण रेल्वेच्या समन्वयाने विशेष गाडी धावणार आहे. तमिळनाडू राज्यातील इरोड जंक्शन ते राजस्थान – येथील बारमेर रेल्वेस्थानकादरम्यान ही रेल्वे धावणार असल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाने सांगितले.

कोकण रेल्वेमार्गावर सोडण्यात आलेल्या जादा गाड्यांमध्ये इरोड जंक्शन (तमिळनाडू) ते बारमेर राजस्थान अशी साप्ताहिक विशेष गाडी ८ एप्रिल ते १० मेपर्यंत धावणार आहे. ही गाडी दर मंगळवारी इरोड जंक्शन येथून सकाळी ६:२० वाजता सुटेल. ती तिसऱ्या दिवशी पहाटे ४:३० वाजता बारमेरला पोहोचेल. तिचा परतीचा प्रवास बारमेर ते इरोड जंक्शन असा ११ एप्रिल ते १३ मेपर्यंत दर शुक्रवारी सुरू राहील. ती बारमेरहून रात्री २२:५० वाजता सुटेल. ही गाडी तिसऱ्या दिवशी रात्री २०:१५ वाजता इरोड जंक्शनला पोहोचेल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:25 PM 05/Apr/2025