रत्नागिरी : उन्हाळी हंगामातील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी दरम्यान वातानुकूलित साप्ताहिक एक्स्प्रेस ११ एप्रिलपासून धावणार आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार लो. टिळक टर्मिनस ते करमाळी साप्ताहिक वातानुकूलित एक्स्प्रेस (०१०५१) ही दि. ११ एप्रिल ते २३ मे २०२५ या कालावधीत दर शुक्रवारी धावणार आहे. ही गाडी लो. टिळक टर्मिनस येथून रात्री १० वा. १५ मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता ती गोव्यात करमाळीला पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात ही गाडी (०१०५२) दि. १२ एप्रिल ते २४ मे या कालावधीत करमाळी येथून सुटणार आहे. ही गाडी करमाळी येथून दुपारी अडीच वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वा. ५ मिनिटांनी ती मुंबईत लो. टिळक टर्मिनसला पोहचेल.
ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी तसेच थिवी या स्थानकांवर थांबणार आहे.
ही गाडी एकूण २२ एलएचबी तसेच संपूर्ण वातानूकुलित असेल. यातील लो. टिळक टर्मिनस ते करमाळी या फेरीसाठीचे आरक्षण दि. ८ एप्रिल २०२५ रोजी खुले होणार आहे. उपलब्ध करून दिल्या गेल्या नसल्याने कर्मचाऱ्यांना अनेक अडचणी व समस्यांचा सामना करावा लागणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:57 PM 08/Apr/2025













