गुहागर : आजच्या विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात टिकायचे असल्यास कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नसल्याचे मत गुहागर प्राथमिक रुग्णालयाचे डॉ. नीलेश कुमार ढेरे यांनी व्यक्त केले. श्रीमती अन्नपूर्णा श्रीधर वैद्य प्राथमिक विद्यालय गुहागर या शाळेच्या बक्षीस समारंभ कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर गुहागर एज्युकेशन सोसायटीचे संचालक राकेश साखरकर, पदसिद्ध सदस्य शामल आरेकर, पत्रकार मंदार गोयथळे, मुख्याध्यापक समीर गुरव, शिक्षक संजय गमरे, प्रणाली बेंडल, ज्योत्सना गमरे, सायली आवटे, समिती सदस्य संदीप बागकर, स्वप्नगंधा डीगे उपस्थित होते. यावेळी २०२४-२५ बेस्ट ऑल राऊंडर विद्यार्थी (इयत्ता पहिली) गार्गी निमकर, इयत्ता दुसरी अन्वी बने, इयत्ता तिसरी साई गोडसे, इयत्ता चौथी अभिज्ञा दिनेश पवार या यशस्वी विद्यार्थ्यांना मेडल प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून साकेत गुरव याची निवड करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:57 PM 09/Apr/2025














