रत्नागिरी : क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयासाठी १०० दिवसांचा कृती आराखडा आणि छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांतर्गत रत्नागिरी तालुक्यातील फणसोप महसूल मंडळामध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा लाभ ३५४ जणांना झाला असून, त्यामध्ये ६० जणांचे उपन्न दाखले वाटप करण्यात आले आहेत.
फणसोप महसूल मंडळामध्ये बुधवारी (ता. ९) दाखले वितरणाचा उपक्रम घेण्यात आला. या वेळी उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे, अप्पर तहसीलदार सचिन गोसावी, माधवी कांबळे, निवासी नायब तहसीलदार रिद्धी आखाडे, अनंत चव्हाण, फणसोप सरपंच राधिका साळवी, कोळंबे सरपंच प्रशांत पाटील, उपसरपंच गोताड, ग्रामपंचायत सदस्य रितेश साळवी,
मिलिंद कांबळे, ग्राममहसूल अधिकारी आकाश भगत आदी उपस्थित होते. या शिबिरामध्ये एकूण ४०० नागरिक उपस्थित होते.
या शिबिरात १८९ उत्पन्न दाखल्यांचे वितरण करण्यात आले. तसेच या शिबिरात ३० लाभार्थ्यांचे आधार अपडेट, अॅग्रीस्टॅकचे ५ लाभार्थी, फेरफार ३ लाभार्थी, ५ लाभार्थ्यांना सातबारा वाटप, नऊ नंबर नोटीस वाटप ९ लाभार्थी, रेशनकार्ड नाव कमी-जास्त करणे ३७ लाभार्थी, संजय गांधी योजना १ लाभार्थी, नवीन रेशनकार्ड अर्ज ७लाभार्थी, नवीन रेशनकार्ड वाटप ७लाभार्थी आहेत. या शिबिराला सेतूमधील कर्मचारी, घडशी, महा ई-सेवा केंद्राचे दीपेश साळवी, बीएलओ, पोलिस पाटील तसेच आरोग्य विभाग, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 AM 11/Apr/2025














