राजापूर : क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने केंद्र व राज्यशासनातर्फे शंभर दिवसांची क्षयरोग मुक्ती मोहीम राबविण्यात आली आहे. या अभियानात राजापूर तालुक्यातील सुमारे १९ ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त ठरल्या असून, त्यातील चार ग्रामपंचायतींना रौप्यपदक मिळणार आहे.

क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने शासनातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यामध्ये आरोग्य विभागाच्या माध्यमातून गावोगावी सर्वेक्षण करून समाज प्रबोधनही केले जात आहे. केंद्र व राज्यशासनातर्फे शंभर दिवसांची क्षयरोगमुक्ती मोहीमही नुकतीच राबविण्यात आली. त्यामध्ये आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले.
जिथे बाधित आढळले तिथे कोणती काळजी घ्यावी, या संबंधी मार्गदर्शनही करण्यात आले. ज्या ग्रामपंचायतींमध्ये १ हजार लोकसंख्येच्या प्रमाणात १ क्षयरोग रुग्ण किंवा त्यापेक्षा कमी म्हणजेच अजिबात रुग्ण नसलेल्या ग्रामपंचायतींना क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत म्हणून जाहीर करण्यात येते. या क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत अभियानामध्ये पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतींना पहिल्या वर्षी टीबीमुक्त असल्यास कांस्य, दुसऱ्या वर्षी रजत आणि सलग तीन वर्षे टीबीमुक्त राहिल्यास सुवर्ण प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते. त्याप्रमाणे तालुक्यातील १४ ग्रामपंचायती ब्राँझपदक विजेत्या, तर ४ ग्रामपंचायती सिल्व्हर पदक विजेत्या ठरल्या आहेत.
पदक विजेत्या ग्रामपंचायती
ब्राँझ पदक : अणसुरे, आडवली, ओझर, चिखलगाव, दसूर, जवळेथर, कणेरी, खडीकोळवण, पांगरी, खिणगिणी, शिवणेखुर्द, तारळ, परटवली, फुपेरे, शीळ, सिल्व्हर पदक : जैतापूर, मोगरे, झयें, वडवली
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:38 AM 11/Apr/2025














