खेड : दिवसेंदिवस उन्हाचा कडाका वाढत असून, त्याचा परिणाम मनुष्यासह सर्वच प्राण्यांवर होत आहे. विहिरी, नद्या कोरड्या पडल्यामुळे ताड्यावस्त्यांवर निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात्रा करण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. नैसर्गिक स्रोत आठल्यामुळे जंगलातील मुक्या प्राण्यांना व पक्ष्यांना पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. भूकेपोटी किंवा पाण्याविना मुक्या प्राण्यांची परवड होत आहे. या मुक्या प्राण्यांची तहान भागावी यासाठी खेड वनविभागाने सात्विणगाव येथील वनपरिक्षेत्रात दोन पाणवठे तयार केले आहेत. ही संकल्पना खेड येथील वनपाल सुरेश उपरे यांनी मांडली होती.

खेड तालुक्यातील सात्विणगाव येथे वनविभागाचे ११४ हेक्टरवर शासकीय वनक्षेत्र आहे. या वनक्षेत्रामध्ये बिबटे, भेकर, नीलगाय, मोर, रानडूक्कर, साळिंदर कोल्हे, काळमांजर यांसह अन्य वन्यप्राणी तसेच विविध सरपटणारे प्राणी, विविध पक्षी आढळून वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची जवळपास कोठेही सोय नाही. जंगलात ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यावरच हे प्राणी अवलंबून असता काहीवेळा हे प्राणी पिण्याच्या पाण्यासाठी जवळील वहाळापर्यंत येतात. यंदा उन्हाचा कडाका वाढला असून, भूगर्भातील पाणीपातळी कमी होऊ लागली आहे. वहाळ विहिरी कोरडडे पडल्या आहे त्यामुळे वन्यप्राण्यांना उन्हाळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे अजून दीड महिना उन्हाचा रखरखाट राहणार आहे.
सात्विणगाव येथील वनविभागाने जंगलात श्रमदानातून पाणवठे तयार करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणीही केली. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी वन्यप्राण्यांची होणारी वणवण थांबणार आहे. यासाठी वनरक्षक अशोक ढाकणे, रानवा बंवर्गेकर, परमेश्वर डोईफोडे, वैभव काटेखाये, प्रियांका कदम यांनी हे दोन पाणवठे तयार केले आहेत. या पाणवठ्याची पाणी साठवण क्षमता सुमारे ६०० लिटर आहे. पाणवठ्यामधील पाणी संपत आल्यावर आवश्यकतेनुसार तिथे टैंकरने स्वच्छ पाणी वेळोवेळी भरले जाणार आहे. येथील जंगलभागात वन्यप्राण्यांना, पक्ष्यांना पाण्याची सोय झाल्यामुळे आजूबाजूच्या जंगलातील प्राणी तिथे वास्तव्य करणार आहेत.
या उपक्रमाबद्दल विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई यांच्यासह सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड, परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश पाटील यांनी नुकतीच पाणवठ्यांची पाहणी केली आणि खेडच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
सर्वच गोष्टींसाठी शासनावर अवलंबून न राहता प्रत्येक गावातीत ग्रामस्थांनी एकत्र येऊन आपल्या आजूबाजूच्या जंगलभागात वन्यप्राणी, पक्षी यांच्यासाठी पाणवठे तयार केले पाहिजेत. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखता जाईल आणि प्राणी व पक्ष्यांचे उन्हामुळे संरक्षण होईल. डॉ. राहुल चोपडे, पक्षीमित्र
सात गावात विस्तारलेले वनक्षेत्र
खेड तालुक्यात सात्विणगाव, घेरारसाळगड, घेरासुमारगड, वाडीवेलदार, वडगाव बुद्रुक, कळंबणी खुर्द, विरमणी अशा ७ गावांमध्ये वनविभागाचे २३३८. ६७ हेक्टर शासकीय राखीव वनक्षेत्र आहे. त्यामध्ये छोटी-मोठी अनेक दुर्मिळ झाडे आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:10 PM 11/Apr/2025














