रत्नागिरी : शहरातील प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथील गारवा बिअर शॉपीच्या बाजूला सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शैलेश गजानन शितप (वय ३७, रा. जाकादेवी शितपवाडी, रत्नागिरी) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.
रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल अमित पालवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १० एप्रिल रोजी रात्री सव्वाआठच्या सुमारास ते गस्त घालत असताना प्रमोद महाजन क्रीडा संकुलाजवळ असलेल्या गारवा बिअर शॉपीच्या बाजूला एका व्यक्तीला रस्त्याच्या कडेला आडोशाला बसून बिअर पिताना पाहिले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल पालवे यांच्या फिर्यादीवरून शैलेश शितप याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 AM 12/Apr/2025














