रत्नागिरी : शहरातील प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या समोरील रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून गोंधळ घातल्याची घटना १० एप्रिल रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.
रत्नागिरी शहर पोलिसांनी मद्यधुंद तरुणाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील मेर्वी गुरववाडी येथील नंदकुमार राजाराम गुरव हा प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या समोरील रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत मोठ्या आवाजात आरडाओरडा करत होता आणि असभ्य वर्तन करत होता. यावेळी कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल मनिषा शैलेश होरंबे यांनी त्याला ताब्यात घेतले.
याप्रकरणी मनिषा होरंबे यांच्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात नंदकुमार गुरव याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८५ (१) (२) आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११०/११७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 AM 12/Apr/2025














