चिपळूण : अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हाध्यक्षपदी तानू आंबेकर तर कार्याध्यक्षपदी नंदलाल शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने जिल्हा प्रेरणा मेळाव्याचे आयोजन चिपळूण येथील आंबेडकर भवन येथे करण्यात आले होते. या प्रेरणा मेळाव्यात नवीन जिल्हा कार्यकारिणी निवडण्यात आली.
चिपळुणातील बैठकीवेळी अंनिसचे राज्य प्रधान सचिव विजय परब, विजय पोटफोडे, सचिन गोवळकर, सचिन मोहिते तसेच मंडणगड, खेड, चिपळूण, लांजा, संगमेश्वर, देवरूख, राजापूर, गुहागर येथील शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते.
नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : उपाध्यक्ष विलास कोलपे, विजय कांबळे, प्रधान सचिव सुहास शिगम, संदीप गोवळकर, विविध उपक्रम कार्यवाह भीमराव गगणे, वैज्ञानिक जाणीव शिक्षण प्रकल्प कार्यवाह अनंत पवार, सोशल मीडिया व्यवस्थापन कार्यवाह मनोज जाधव, कायदेविषयक कार्यवाह अॅड. स्मिता कदम, संविधान जागर कार्यवाह महावीर मिसाळ, संपर्क व समन्वय विभाग कार्यवाह युयुत्सू आर्ते यांचा समावेश आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 12/Apr/2025














