राजापुरातील १०१ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे २२ एप्रिलला आरक्षण सोडत

राजापूर : राजापूर तालुक्यातील एकूण १०१ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी आरक्षण सोडत पद्धतीने निश्चित केले जाणार आहे.

जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या पत्रानुसार ही प्रक्रिया पार पडणार असून, यासाठी मंगळवार दिनांक २२ एप्रिल, २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, राजापूर येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

तरी राजापूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य, ग्रामस्थ तसेच लोकप्रतिनिधी, सुजाण नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या महत्त्वपूर्ण सोडतीच्या वेळी उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार कार्यालयातर्फे करण्यात आले आहे. गटविकास अधिकारी पंचायत समिती राजापूर आणि सर्व ग्राम महसूल अधिकारी यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:15 PM 17/Apr/2025