लांजा : लांजा-आसगे-दाभोळे मार्गावर अवजड वाहनांद्वारे चिरा वाहतूक सुरूच आहे. सध्या काही वाहनातून केली जाणारी चिरा वाहतूक अतिशय धोकादायकपणे सुरू आहे; मात्र संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
लांजा-आसगे-दाभोळे मार्गावर अवजड वाहनांद्वारे चिरा वाहतूक सुरूच असल्याचे चित्र आहे. मोठमोठ्या ट्रेलरद्वारे, ट्रकातून धोकादायकपणे चिरा वाहतूक सुरू आहे. त्यामुळे अपघाताचे धोके वाढू लागले आहेत. काहीच दिवसांपूर्वी आसगे येथे जागरुक नागरिकांनी ही धोकादायक पद्धतीने सुरू असलेल्या काही चिरांच्या गाड्या थांबवून ठेवल्या होत्या. त्यांच्यावर कारवाईची मागणीदेखील केली होती. त्यामुळे चिरा वाहतुकीवर कारवाई होईल अशी अपेक्षा होती.
चिरा वाहतुकीबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी आवाज उठवूनही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. मोठा अनर्थ घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 AM 19/Apr/2025














