जाकादेवी, खालगाव पंचक्रोशीत बीएसएनएल सेवेबाबत ग्राहकांमधून नाराजी

जाकादेवी : जाकादेवी, खालगाव पंचक्रोशीत बीएसएनएल टॉवर अद्ययावत नसल्यामुळे ग्राहकांची गैरसोय होत आहे. अनेकवेळा ग्राहकांकडून मोबाईल सुरू करण्यासाठीचे केलेले रिचार्ज व्यवस्थित होत नसल्याने आर्थिक भुर्दंड बसत आहे. बीएसएनएलच्या सेवेबाबत ग्राहकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

जाकादेवी दशक्रोशीतील परिसरात मोठ्याप्रमाणात लोकवस्ती आहे. रत्नागिरी, संगमेश्वर आणि गुहागर या तीन तालुक्यांना जोडणारा हा परिसर आहे. सध्याच्या माहिती व तंत्रज्ञान युगामध्ये महत्त्वाच्या कामासाठी मोबाईलचा अधिक वापर होत आहे. मात्र गेल्या आठ दिवसांपासून या परिसरातील जनसंपर्क तुटलेला आहे. शासकीय निमशासकीय व खासगी कार्यालयातील महत्त्वपूर्ण कामे कोलमडलेली आहेत.

जाकादेवी येथे बीएसएनएल टॉवरची क्षमता फार कमी आहे. त्यामुळे बीएसएनएलचे नेटवर्क गायब होत आहे. याकडे बीएसएनएलची यंत्रणा डोळेझाक करीत आहे. त्यामुळे जाकादेवी पंचक्रोशीतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या टॉवरची डागडुजी करून तो अद्ययावत बनवा, अशी मागणी ग्राहकांकडून केली जात आहे. या भागातील सर्वसामान्य शेतकरीवर्ग बीएसएनएलचा वापर करतात. बीएसएनएल विभागाकडून शेतकऱ्यांसह मध्यमवर्गातील ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी बीएसएनएलधारकांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 AM 21/Apr/2025