कोकण कपिला गाय कोकणातून हद्दपार होण्याची भीती : सिद्धेश पाटील

रामपूर : स्वदेशी कोकण कपिला गाईचे पालन आता शेतकरीत करीत नाहीत. कोकणातून ती हद्दपार होण्याची भीती आहे. कपिला गाय ही आत्ताच्या पिढीला चित्रांच्या माध्यमातून दाखवावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या गाईचे महत्त्व ओळखून तिचे पालन करावे, असे आवाहन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कृषीतज्ज्ञ सिद्धेश पाटील यांनी केले.

चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने येथे कृषीमित्र प्रताप सुर्वे यांच्या निवासस्थानी सृष्टी प्रतिष्ठानतर्फे मार्गताम्हाने व घोणसरे पंचक्रोशितील शेतकऱ्यांसाठी मेळावा घेण्यात आला.

यावेळी पाटील यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, कपिला गाईचे पालन करणे सोपे आहे. आपल्याकडे हिरवा चारा असल्याने तिच्या वाढीला पोषक वातावरण आहे.

शिवाय दूधही चांगले देते. शेण, गोमूत्र यांच्यामध्येही पोषक घटक असल्याने निरोगी आयुष्यासाठी कपिला गाय पाळणे गरजेचे आहे. यावेळी पाटील यांनी शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने शेती करावी. फळरोपांना शेणखत पोषक आहे, असे सांगितले.

Mahrashi karve ANM

यावेळी देवघरचे सानुप जाधव, काशिनाथ सुर्वे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी कृषी पर्यवेक्षक रवींद्र घरत, कृषीमित्र प्रताप सुर्वे, प्रदीप कदम, भरत देवरूखकर, राजेंद्र विचारे, दत्ताराम ताम्हणकर आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 AM 21/Apr/2025