रत्नागिरी : भाजपच्या रत्नागिरी उत्तरमध्ये ७ व दक्षिणमध्ये १२ मंडल अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये नव्या दमाच्या युवकांना संधी देण्यात आली असून, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका जिंकण्यासाठी संघटन बांधणी करण्यात येणार आहे.
राज्यभरात भाजपने पक्षीय पातळीवर एकूण १२२१ मंडळ स्थापन केले. त्यापैकी ९६३ मंडळ अध्यक्षांची नियुक्ती काल केली. यातील २५८ मंडळे नव्यानं स्थापन केली आहेत. कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध पूर्ण झाली. ‘संघटन हेच खरे बळ’ या तत्त्वावर चालत, भाजपनं आता महाराष्ट्रात मजबूत गड उभारण्याची तयारी सुरू केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपने रणनिती आखली आहे. अधिक गावखेड्यांपर्यंत पोहोचवण्याचा आणि सर्वसामान्य मतदाराशी थेट संवाद साधण्याचा ध्यास घेतला आहे.
जिल्ह्यातील अध्यक्ष निवडी
रत्नागिरी जिल्हा उत्तर- दापोली शहर जया साळवी, ग्रामीण सचिन होडवे, खेड उत्तर ऋषिकेश मोरे, दक्षिण विनोद चाळके, मंडणगड प्रवीण कदम, गुहागर अभय भाटकर, चिपळूण ग्रामीण पश्चिम उदय घाग.
रत्नागिरी दक्षिण चिपळूण ग्रामीण विनोद भुरण, चिपळूण शहर-शशिकांत मोदी, संगमेश्वर उत्तर- विनोद मस्के, संगमेश्वर दक्षिण- रूपेश कदम, रत्नागिरी शहर-परशुराम ढेकणे, शहर दक्षिण दादा दळी, रत्नागिरी मध्य-प्रतीक देसाई, रत्नागिरी उत्तर विवेक सुर्वे, लांजा दक्षिण शैलेश खामकर, लांजा उत्तर विराज हरमले, राजापूर पश्चिम मोहन घुमे, राजापूर पूर्व-एकनाथ मुंढे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 AM 21/Apr/2025














