दापोली : रस्त्यालगत सार्वजनिक ठिकाणी विदेशी दारु पिणाऱ्या प्रौढावर दापोली पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी सकाळी दापोली ते चंद्रनगर येथे करण्यात आली. याप्रकरणी मिथुन सखाराम मस्कर यांनी फिर्याद दिली आहे.
त्यानुसार मनोज शंकर कारंडे (३७, रा. नवशी – सर्वोदयवाडी, दापोली) यांच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास दापोली पोलिस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:17 PM 22/Apr/2025














