Arnab Cyclone Marathi News: बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेल्या ‘अर्णब’ चक्रीवादळाचा भारताच्या मुख्य भूमीत प्रवेश; महाराष्ट्रासह पूर्व विदर्भात पावसाचा इशारा

Arnab Cyclone Marathi News: बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेल्या 'अर्णब' चक्रीवादळाचा भारताच्या मुख्य भूमीत प्रवेश; महाराष्ट्रासह पूर्व विदर्भात पावसाचा इशारा

नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राकडून गडचिरोली जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी; आंध्र प्रदेशात अचानक पूर येण्याचा धोका

मुंबई : Arnab Cyclone Marathi News च्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात एकीकडे तीव्र दुष्काळाचे सावट असतानाच, दुसरीकडे बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेल्या ‘अर्णब’ चक्रीवादळाने (Arnab Cyclone) भारताच्या मुख्य भूमीत प्रवेश केला आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव ओडिशा, आंध्र प्रदेश, छत्तीसगडसह महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील काही भागांवरही होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने दिलेल्या अलर्टनुसार (IMD Rain Alert), आज (२८ ऑक्टोबर) गडचिरोली जिल्ह्यात अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक प्रवीण कुमार यांनी व्यक्त केला आहे.

अर्णब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे (Arnab Cyclone Effect on Vidarbha) हवामान विभागाने गडचिरोली जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. याशिवाय पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि काही अंशी नागपूर व वर्धा जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पूर्व विदर्भातील गडचिरोली वगळता इतर जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ‘येलो अलर्ट’ दिला असून, यादरम्यान अनेक भागांमध्ये सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागाने स्पष्ट केली आहे.

विमानसेवेवर परिणाम आणि आंध्र प्रदेशात पुराचा धोका
या चक्रीवादळाचा फटका विमानसेवेलाही (Cyclone Arnab also affects air services) बसला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या या वादळांमुळे आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम आणि विजयवाडा येथून येणाऱ्या-जाणाऱ्या विमानांच्या उड्डाणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने २७ ऑक्टोबर रोजी प्रवासविषयक सूचना जारी करून प्रवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. प्रतिकूल हवामानामुळे विमानांच्या वेळापत्रकात बदल होऊ शकतो, त्यामुळे प्रवाशांनी अधिकृत संकेतस्थळावर विमानाची सद्यस्थिती तपासावी, असे सांगण्यात आले आहे.

Shanti real estate 1

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) आंध्र प्रदेशातील (Andra Pradesh Arnab Cyclone) अनाकापल्ली, अल्लुरी सीताराम राजू, काकीनाडा, विशाखापट्टणम आणि विजयनगरम जिल्ह्यांच्या काही भागांत पुढील ६ तासांत अचानक पूर (Flash Floods) येण्याचा मध्यम ते गंभीर धोका असल्याचा इशारा दिला आहे. तसेच पुढील २४ ते ३६ तासांत अनेक भागांत पूर स्थिती निर्माण होऊ शकते. नोंदवलेल्या आकडेवारीनुसार, विशाखापट्टणम येथे २१७ मिमी, कलिंगपट्टणम येथे १४७ मिमी, तुनी येथे १२३ मिमी, काकीनाडा येथे ११८ मिमी, मछलीपट्टणम येथे ११५ मिमी, गोपालपूर येथे ९४ मिमी आणि पुरी येथे ७२ मिमी इतक्या मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.