चिपळूणात २९ डिसेंबरला हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

चिपळूण : संघर्ष क्रीडा मंडळ यांच्यातर्फे चिपळूण हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन रविवार, दि. २९ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. ही स्पर्धा सकाळी साडेसहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

ही हाफ मॅरेथॉन कराड रस्त्याने बहादूरशेखपर्यंत जाईल. तेथून मुंबई गोवा महामार्गाच्या डाव्या मार्गिकेतून परशुराम स्टॉपपर्यंत जाईल. त्याच मार्गावरून परत येऊन पवन तलाव मैदानात बक्षीस वितरण समारंभ होईल. तीन विभागांत घेण्यात येणार असून, पुरुष व महिला असे प्रत्येक विभागात पाच गट असणार आहेत. प्लास्टिक कचरामुक्ती असा संदेश या मॅरेथॉन स्पर्धेतून देण्यात येणार आहे अशी माहिती संघर्ष क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सचिन कदम व भाऊ काटदरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. हाफ मॅरेथॉनसाठी २१.९७ कि.मी., १० कि.मी., ५ कि.मी. पर्यंत अंतर असणार आहे. १८ वर्षांवरील खुला गट, ३२ ते ४० त्यानंतर ४१ ते ५०,५१ ते ६०, आणि ६० तसेच या १५ ते १७वर्षे असा विशेष गट असणार आहे. या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:16 PM 09/Oct/2024

Ratnagiri Khabardar add image