रत्नागिरी : शहरातील वरची आळी येथे बेकायदेशिरपणे जुगार खेळ चालवणाऱ्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवार २२ एप्रिल रोजी सायंकाळी ७.१० वा. करण्यात आली. उदय जगदीश चव्हाण (५२, रा. खालचा वठार सडामिऱ्या, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
त्याच्या विरोधात पोलिस हेड कॉस्टेबल अमोल भोसले यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित हा वरची आळी येथील एका पडक्या घराच्या मागे बेकायदेशिरपणे मटका जुगार खेळ चालवत असताना आढळून आला. त्याच्याकडून रोख रक्कम आणि मटका जुगाराचे साहित्य असा एकूण १ हजार ९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 AM 24/Apr/2025














