रत्नागिरी : नाचणे-काजरघाटी रस्ता दुरुस्तीची मागणी

रत्नागिरी : रत्नागिरीजवळच्या नाचणे गावातील श्री नवलाई देवी मंदिर ते काजरघाटी धारेपर्यंतचा रस्ता अतिशय खराब झाला आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी भाजपने केली आहे.

याबाबत पंतप्रधान सडक योजना विभागाचे उपअभियंता अंबाजी माने यांच्याकडे निवेदन देण्यात आले.

या वेळी भाजपचे रत्नागिरी तालुका उपाध्यक्ष सुनील आडिवरेकर, तालुका सरचिटणीस ओंकार फडके, नाचणे ग्रामपंचायत सदस्य दीप्ती फडके, बूथ अध्यक्ष समीर सावंत उपस्थित होते.

उपअभियंता माने यांनी हे निवेदन स्वीकारून हा रस्ता लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:35 09-10-2024