पहलगाम दहशतवादी हल्ला : दापोलीत पोलिस यंत्रणा सतर्क

दापोली : पर्यटकांवर काश्मीर खोऱ्यात पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात राज्यातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हयातील पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून दापोली पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. दापोली पोलिस प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेऊन आहेत. तालुक्याला विस्तीर्ण समुद्रकिनारा असल्याने किनारपट्टी भागात पोलिस यंत्रणा लक्ष ठेऊन आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चेकपोस्ट, प्रार्थनास्थळे, या ठिकाणची सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

हर्णे, बुरोंडी, बुरोंडी चेकपोस्ट या ठिकाणी पोलीस यंत्रणा सजग आहे. बाहेरून येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात असून सर्व हालचालीवर पोलिस नजर ठेऊन आहेत. तालुक्यात पर्यटनाचा हंगाम असल्याने वेगवेगळ्या ठिकाणाहून पर्यटक दापोलीत आले आहेत. पर्यटक किनाऱ्यावर मोठ्या संख्येने असल्याने अशावेळी पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने किनारपट्टीवरील पोलिस सुरक्षा वाढविण्यात आली आहे तर जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी दिलेल्या सूचनांचे पालन दापोलीत होताना दिसत आहे. किनारपट्टी भागातून दहशवादी हल्ला होऊ शकतो यामुळे पोलीस यंत्रणा किनारपट्टीवर अलर्ट आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 AM 24/Apr/2025