सुमित ओसवाल यांनी घेतली अध्यक्षपदाची शपथ
रत्नागिरी: लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी आणि लिओ क्लब ऑफ रत्नागिरीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा शनिवार, ४ जुलै रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अतिशय दिमाखदार पद्धतीने पार पडला. या सोहळ्यात रत्नागिरीतील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक लायन सुमीत भैरूमल ओसवाल MJF यांनी अध्यक्ष म्हणून अधिकृतपणे शपथ घेतली. त्यांच्यासोबतच ओसवाल मेडिकलचे सर्वेसर्वा लायन ललित शहा यांनी सचिव म्हणून, तर दर्पण फोटो स्टुडिओचे लायन प्रदिप हर्चिरकर यांनी खजिनदार पदाची धुरा सांभाळत शपथ ग्रहण केली.
Lions Club Ratnagiri Ceremony: माजी प्रांतपाल जगदिश पुरोहित यांच्या हस्ते पदप्रदान
या भव्य सोहळ्यासाठी पदप्रदान अधिकारी (Installation Officer) म्हणून मसूर क्लबचे माजी प्रांतपाल PDG लायन जगदिश पुरोहित PMJF (Vice area GAT leader) यांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली, ज्यामध्ये नृत्यार्पण ॲकॅडमीच्या नृत्यांगनांनी अप्रतिम नृत्य सादरीकरण केले.
पदग्रहण सोहळा संपन्न झाल्यानंतर नुतन अध्यक्ष लायन सुमीत ओसवाल यांनी सर्व कार्यकारी सदस्यांचा, मावळत्या पदाधिकाऱ्यांचा तसेच बहुप्रांतीय परिषदेत मानाचे पुरस्कार प्राप्त करणाऱ्या लायन सदस्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विशेष सन्मान केला. याप्रसंगी नवनिर्वाचित रिजन चेअरमन डॉ. निलेश पाटील, झोन चेअरमन शिल्पा पानवलकर व चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. संतोष बेडेकर यांनी नुतन पदाधिकाऱ्यांना वर्षभरातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सामाजिक बांधिलकी: जिल्हा परिषद शाळेला कपाट प्रदान
लायन्स क्लबच्या परंपरेनुसार, या सोहळ्याचे औचित्य साधून सामाजिक सेवाकार्याचा शुभारंभ करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळा क्रमांक २, वायंगणी या शाळेला एक कपाट भेट म्हणून प्रदान करण्यात आले.
या प्रसंगी मावळते अध्यक्ष लायन संजय पटवर्धन MJF, मावळते सचिव लायन शरद नागवेकर, मावळते खजिनदार लायन मनोज सावंत आणि मावळते लिओ अध्यक्ष शशांक तांबे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. त्यांनी वर्षभरात राबवलेल्या विविध उपक्रमांचा व सामाजिक कार्याचा आढावा घेत क्लबच्या सर्व सदस्यांचे आभार मानले.
सुमित ओसवाल यांच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा
अध्यक्ष सुमीत ओसवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी वर्षासाठी विविध पदांवर नियुक्त करण्यात आलेल्या खालील सदस्यांनाही या प्रसंगी शपथ देण्यात आली:
लायन दिप्ती फडके, लायन ओंकार फडके, लायन मनोज सावंत, लायन डॉक्टर शिवानी पानवलकर, लायन डॉक्टर सचिन पानवलकर, लायन शिल्पा पानवलकर, लायन पराग पानवलकर, लायन मोना ओसवाल, लायन श्रीपाद केळकर, लायन श्रेया केळकर, लायन डॉक्टर संतोष बेडेकर, लायन सुप्रिया बेडेकर, लायन प्राची शिंदे, लायन अस्लम वस्ता, लायन ॲडव्होकेट शबाना वस्ता, लायन अभिजित गोडबोले, लायन डॉक्टर शैलेंद्र भोळे, लायन दिपक साळवी, लायन हर्षद पवार, लायन संजय पटवर्धन, लायन डॉक्टर गणेश कुळकर्णी, लायन डॉक्टर रमेश चव्हाण, लायन हेरंब पटवर्धन, लायन सुधीर वणजू, लायन अमेय विरकर, लायन विशाल ढोकळे, लायन सुनीलदत्त देसाई आणि लायन नित्यानंद भुते.
लिओ क्लब ऑफ रत्नागिरीचाही पदग्रहण सोहळा संपन्न
लायन्स क्लबसोबतच युवा शाखा असलेल्या लिओ क्लब ऑफ रत्नागिरीचाही पदग्रहण सोहळा याच मंचावर उत्साहात पार पडला. यामध्ये नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून लिओ अमृत गोरे, सचिव म्हणून लिओ रूतूजा शिंदे आणि खजिनदार म्हणून लिओ चिन्मय प्रभू यांनी आपल्या पदाची शपथ घेतली.
“येणाऱ्या संपूर्ण वर्षभरात समाजातील विविध घटकांसाठी आणि गरजू लोकांसाठी जे काही सर्वोत्तम सामाजिक काम करता येईल, ते करण्यासाठी आमची संपूर्ण टीम कटिबद्ध आहे,” अशी ग्वाही नूतन अध्यक्ष लायन सुमीत ओसवाल यांनी आपल्या भाषणातून दिली. या सोहळ्यासाठी रिअल इस्टेट क्षेत्रातील नामांकित संस्था ‘क्रेडाई’ची (CREDAI) संपूर्ण टीम विशेष रूपाने उपस्थित होती. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन लायन अभिजित गोडबोले व लायन श्रेया केळकर यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:32 07-07-2026














