पावस : गौतमी नदीकिनारी संरक्षक भिंतीचे काम युद्धपातळीवर सुरू

पावस : सहाय्यक पतन अभियंता रत्नागिरी यांच्या योजना ४७ ११ लेखा शीर्ष अंतर्गत पावस गौतमी नदीच्या किनारी समाधी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत संरक्षक भिंतीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी एक कोटी वीस लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे त्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

स्वामी स्वरूपानंद मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरती नंदाची बाग दरम्यान गौतमी नदीकिनारी असलेल्या रस्त्यावरती पावसाळ्यामध्ये पुराच्या पाण्यामुळे धोका निर्माण झाला होता भविष्यात रस्ता ढासण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे त्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यात यावी अशी मागणी सुरू होती अखेर पालकमंत्री उदय सामंत यांनी गौतमी किनारी संरक्षक भिंतीकरिता सहाय्यक पतन
अभियंता रत्नागिरी यांच्या १ कोटी २० लाखाचा निधी मंजूर केला त्या कामाची भूमिपूजन सरपंच चेतना सामंत, उपसरपंच प्रवीण शिंदे ग्रामविकास अधिकारी गुरव व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली हे काम युद्ध पातळीवरती सुरू आहे त्यामुळे या भागातील ढासळत जाणारा रस्ता यावरती संरक्षक भिंतीमुळे मजबूत होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 AM 24/Apr/2025