संगमेश्वर : सोनवडे फाटा ते मुचरी घोटलवाडी रस्त्याची दुरवस्था

साडवली : संगमेश्वर तालुक्यातील मुचरी येथील सोनवडे फाटा ते मुचरी घोटलवाडी येथील २ किलोमीटर रस्ता एक महिन्यात उखडला. मुचरी बौद्धवाडी ते गवळीवाडी बांधकाम विभागाच्या अखत्यारित हा रस्ता येत असून, महिनाभरात या ठिकाणी दुचाकीचे अनेक अपघात झाले आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठी भगदाडे पडली आहेत. यामुळे मुचरी युवा सामाजिक संघटना आक्रमक झाली असून, त्यांनी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून बुरंबी येथे रास्तारोको आणि उपोषणचे हत्यार उपसले आहे. तसे पत्र बांधकाम विभागाला देण्यात आले आहे.

त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी २४ एप्रिलला सकाळी १० वा. कार्यालयात बैठक आयोजित केल्याचे फोन करून सांगितले. या बैठकीसाठी मुचरी युवाचे अध्यक्ष विलास वामन सुर्वे, स्वप्नील टोपरे, स्वरा टोपरे, किशोर जाधव, सायली भालेकर कार्यालयात गेले असता तिथे अभियंताच उपस्थित नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मुचरी युवा संघटना आक्रमक झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 AM 26/Apr/2025

Tata motars tiago