खेड : शहराजवळील भरणेनाका येथील बहार कमर्शियल कॉम्प्लेक्स याठिकाणी पहिल्या मजल्यावर असणाऱ्या रॉयल हॉस्पिटल येथे एकत्रित महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य अंतर्गत अंगीकृत योजनांचा भव्य शुभारंभ ३० एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता राज्यमंत्री ना. योगेश कदम आणि त्यांच्या पत्नी श्रेया योगेश कदम यांच्याहस्ते होणार आहे. अशी माहिती रॉयल हॉस्पिटलचे निमंत्रक डॉ. सुरज शिखलगर व नजीर अहमद फिरफिरे यांनी दिली.
या शुभारंभ सोहळ्याला माजी आमदार, शिवसेना उपनेते संजय कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, माजी सभापती अण्णा कदम, माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, तालुका आरोग्य अधिकारी शैलेश खरटमल, भरणे सरपंच संतोष गोवळकर यांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे. या जनआरोग्य अंतर्गत अंगीकृत योजनांव्दारे १,३५६ आजारांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया या लाभाबरोबरच प्रति कुटुंब प्रतिवर्ष ५ लक्ष रुपयांचे विमा संरक्षण सुद्धा मिळणार असल्याची माहिती निमंत्रक डॉ. सुरज शिखलगर व नजीर फिरफिरे यांनी दिली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:54 AM 30/Apr/2025














