खेड : जमीन मोजणीवेळी एकास रॉडने मारहाण; चौघांवर गुन्हा

खेड : शहराजवळील भरणे बौद्धवाडी येथे जमीन मोजणीवेळी एकाला रॉडने मारहाण केल्याप्रकरणी दोन महिलांसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (ता. २८) सायंकाळी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली. भरणे येथे झालेल्या या हाणामारीत जखमी झालेल्या सुदर्शन सुनील जाधव (वय ३२) यांनी येथील पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित म्हणून साहिल मिलिंद जाधव, रोशन मिलिंद जाधव व दोन महिला अशा चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

खेड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुदर्शन जाधव आणि त्यांच्याच वाडीतील मंजूषा जाधव यांच्या जागेच्या मोजणीची नोटीस शेजारी असल्यामुळे सुदर्शन जाधव यांना आली होती. त्यामुळे मोजणीवेळी ते घटनास्थळी हजर होते. मोजणी सुरू असताना जागेवरून सुदर्शन जाधव यांना चौघांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी दोन्ही महिलांनी सुदर्शन जाधव यांना पकडून ठेवले आणि साहिल जाधव याने लोखंडी रॉड आणून तक्रारदार सुदर्शन जाधव यांच्या डोक्यात मारला. तक्रारदार सुदर्शन जाधव आणि त्यांचे वडील सुनील जाधव यांना शिवीगाळ केली. याप्रकरणी त्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:12 AM 30/Apr/2025

Gadre3