तन्वी रेडीजला आशियाई योगा स्पर्धेत सुवर्णपदक

चिपळूण : येथील नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे महाविद्यालयातील एफ. वाय.बी. एस्सीची विद्यार्थिनी तन्वी रेडीज हिने आशियाई योगा स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली आहे. या स्पर्धेत तिने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. याबद्दल तिचा नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्यावतीने सत्कार करण्यात आला.

मंगळवार, दि. २९ एप्रिल रोजी मळ्यातील गणपती ते महाविद्यालयापर्यंत ढोलताशांच्या गजरात भव्य रॅली काढून तिचे स्वागत करण्यात आले. तसेच नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या वतीने संस्थेचे चेअरमन मंगेश तांबे यांच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात आला.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश जोशी, व्हा. चेअरमन डॉ. दीपक विखारे, सचिव अतुल चितळे, खजिनदार संजीव खरे, नियामक समिती सदस्य सुचय रेडीज, फैसल कास्कर, माधव टिकेकर, मकरंद साठे, तन्वीचे कुटुंबीय, प्रशिक्षक रणबीर सावंत, शांताराम जोशी, मिनल ओक, प्रशांत देवळेकर उपस्थित होते. यावेळी चेअरमन मंगेश तांबे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला महाविद्यालय प्राचार्य डॉ. माधव बापट, उपप्राचार्य डॉ. मोरे, वरिष्ठ महाविद्यालय जिमखाना प्रमुख डॉ. सम्राट माने, कनिष्ठ महाविद्यालयीन जिमखाना प्रमुख प्रा. विलास जोशी, रजिस्ट्रार अनिल कलकुटकी आदर्दीसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:05 PM 30/Apr/2025

Shanti real estate 1