रत्नागिरी शहरात विद्यार्थ्यांसह आजारी, वृद्धांनाही डीजेचा त्रास

रत्नागिरी : शहरात नवरात्रौत्सवाला अनेक भागांत रात्रीच्या वेळी डीजेच्या मोठ्या आवाजावर दांडिया खेळला जात आहे. मात्र, त्यामुळे परिसरातील आजारी, वृद्ध तसेच बालकांना त्रास होत आहे. काही मंडळे प्रशासनाने आणि पोलिसांनी नियमांचेही घालून दिलेले उल्लंघन करीत आहेत.

सध्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा कालावधी सुरू आहे. अशा स्थितीत डीजेच्या अतिकर्कश आवाजाचा परिणाम या विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही होत आहे. काही मंडळे नियमांचे उल्लंघन करीत असल्याने डीजेचा वापर करणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 10/Oct/2024

Ronic