रत्नागिरी : विशेष अध्ययन शिष्यवृत्तीसाठी अर्ज मुदत वाढवली

Online scholarship

रत्नागिरी : अनुसूचित जाती, नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाच्या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्याकडून जाहिरातीद्वारे अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल अशी होती. जाहिरातीस समाज कल्याण आयुक्तालयाकडून मुदतवाढ देण्यात आलेली आहे, आता अर्ज स्वीकारण्याचा अंतिम तारीख २० मे असा ठेवण्यात आली आहे, असे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी कळवले आहे.

अधिक माहितीसाठी शासनाचे संकेतस्थळ www.maharashtra.gov.in येथील रोजगार या लिंकवर भेट देऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:52 AM 08/May/2025

Rotary School