संगमेश्वर : कासे-गोताडवाडी रस्त्याची डागडुजी

संगमेश्वर : तालुक्यातील कासे-गोताडवाडी रस्त्याला भले मोठे खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांची गैरसोय होत होती. अनेक वर्षे पाठपुरावा करूनही या रस्त्याची डागडुजी झालेली नव्हती. या समस्येची दखल घेऊन कडवई विभागातील शिवसैनिक सुभाष चव्हाण आणि जितेंद्र चव्हाण यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत जाधव यांच्याशी संपर्क साधला.

जाधव यांनी तत्काळ हा समस्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षाच प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांच्याकडे मांडली. त्यांनी या सत्याचे काम प्राधान्याने करण्याची विनंती केली होती. या रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांची ग्रामस्थांची समस्या दूर झाली आहे. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर केली. शिरंबे, पुर्ये आणि आसपासच्या गावांमधून जाणारी एसटी बस पुन्हा सुरू होईल, अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:04 PM 10/Oct/2024